प्ले स्टोर मध्ये विडिओ एडिटिंगसाठी हजारो फ्री apps आहेत. त्यातील उत्तम निवडणे हे कठीणच काम आहे.
विडिओ एडिटिंग app मोबाईलमध्ये असणे हे कधीही चांगले, त्याने तुम्ही कधीही विडिओ एडिट करून सोशाल मीडिया आणि युट्युब वर शेअर करू शकता.
पुढे काही फ्री आणि उत्तम विडिओ एडिटिंग apps ची लिस्ट देत आहे.

१. ऍडोब प्रीमियर क्लिप (Adobe Premiere Clip)

ऍडोब प्रीमियर प्रो सर्वाना माहीतच असेल. ऍडोब प्रीमियर क्लिप हे त्याचेच लहान आणि अँड्रॉइड version आहे. त्यामुळे ते अँड्रॉइड युसर्स मध्ये जास्त वापरले जाते.
हे अतिशय सोपं app आहे. तुम्ही यात विडिओ एडिट, कट, ट्रिम करू शकता, शिवाय तुम्ही व्हिडिओला filters आणि ऑडिओ सुद्धा ऍड करू शकता.

२. फिल्मोरा गो (FilmoraGo)

फिल्मोरा गो हे सुद्धा एक लोकप्रिय विडिओ एडिटिंग app आहे. यात तुम्ही तुमचे विडिओ कट, ट्रिम करू शकता सोबत थिम्स आणि ऑडिओ सुद्धा ऍड करू शकता.
यात तुम्ही इंस्टाग्रामसाठी १:१ आणि युट्युबसाठी १६:९ या साईझ मध्ये विडिओ बनवू शकता.

३. मुव्ही मेकर फॉर युट्युब (Movie Maker for YouTube)

हा सुद्धा अँड्रॉइड वर चालणारा विडिओ एडिटिंगसाठी एक फ्री app आहे. इंस्टाग्राम आणि युट्युब व्हिडिओस बनवण्यासाठी अतिशय सोप्पा.

४. विडिओ शो (VideoShow)

विडिओ एडिटिंग साठी वीडेओशो हा एक उत्तम पर्याय आहे. हा फ्री app असून यात बरेच options आहेत. वापरायला एकदम सोप्पा आणि सोबत ५० पेक्षा जास्त थेम्स देखील आहेत.

५. काइन मास्टर (KineMaster)

वीडेओशो नंतर मला वाटते काइन मास्टर हा सुद्धा उपयोगी विडिओ एडिटिंग app आहे. याचे सर्व ऑपशन्स हे paid app मध्ये असले तरी काही ऑपशन्स फ्री app मध्ये सुद्धा आहेत.

६. मागिस्टो (Magisto – Video Editing & Music Slideshow Maker)

मागिस्टो हा app नुकतंच विडिओ एडिटिंगची सुरुवात करणाऱ्या लोकांसाठी उत्तम आहे. Vloggers साठी हा एक उत्तम पर्याय आहे.

७. व्हिव्हा विडिओ (Viva Video)

व्हिव्हा व्हिडिओचे २०० दशलक्ष पेक्षा जास्त युसर्स आहेत. त्यामुळे युसर्सच्या दृष्टीने हा नंबर १ चा app मानला जातो. यात बरेच ऑपशन्स आहेत, जसे बेसिक विडिओ, सेल्फी, फनी, म्युसिक विडिओ, कोलाज. या app च्या मदतीने तुम्ही फोटोंचा स्लाईड शो सुद्धा बनवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *