आपल्याला सर्वानाच माहीत आहे सर्च इंजिन मध्ये गूगल नंतर युट्युबचाच नंबर लागतो. युट्युब वर एका महिन्याला जवळ जवळ ९० अब्ज page views असतात. येथे ४०० तासाचे व्हिडिओस रोज अपलोड होतात.
युट्युब तुम्हाला तुमच्या विडिओ मधून पैसे कमवण्याची संधी सुद्धा देतो. जर तुम्ही योग्य सबस्क्रायबर्सचा नंबर गाठला आणि तुमच्या व्हिडिओला योग्य views असतील तर तुम्ही तुमच्या विडिओ मधून चांगले पैसे कमवू शकता.
फक्त विडिओ अपलोड केल्याने तुमच्या व्हिडिओला चांगले views नाही मिळत. काही techniques वापरल्याने तुम्ही तुमच्या विडिओचे views वाढवू शकता.

तुम्ही युट्युब वर विडिओ अपलोड केलेला आहे, पण तुम्हाला अपेक्षित असे views नाहीत. म्हणजे कदाचित युट्युब साठी सुद्धा SEO ची गरज असते हे तुम्हाला माहीत नसेल. आपले कोणतेही कन्टेन्टस (माहिती) इंटरनेट वर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी SEO म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चा वापर करावा लागतो.
या पोस्ट मध्ये आपण, तुमच्या विडिओला SEO च्या मदतीने organic views कसे मिळवता येतील हे बघणार आहोत.

युट्युब SEO गाईड

तुमच्या विडिओची रँकिंग ठरवण्यासाठी युट्युबची स्वतःची पद्धत आहे. त्याला Algorithm म्हणतात. काही कंपन्या पैसे घेऊन views आणि subscribers वाढऊन देतात. पण त्याचा चुकीचा परिणाम पुढे जाऊन तुमच्या चॅनेल ला होऊ शकतो. हा पूर्णपणे चुकीचा मार्ग आहे.
आपण views आणि subscribers organic पद्धतीने कसे वाढवता येतील हे या पोस्ट मध्ये बघणार आहोत.

तुमच्या रँकिंग साठी सर्वात महत्वाचं असतं ते view-time. जर तुमचे प्रेक्षक तुमचे विडिओ बघून काही वेळेतच बंद करत असतील तर तुमच्या व्हिडिओची रँक कमी होते. म्हणून त्यासाठी तुमच्या व्हिडिओचं टायटल आणि थंबवेल आकर्षक असलं पाहिजे.

युट्युब SEO च्या महत्वाच्या टिप्स

१. विडिओ टायटल – keywords वापरा

विडिओ टायटल म्हणजे तुमच्या व्हिडिओचं नाव. तुमचा विडिओ लोकांना कोणत्या नावाने दिसेल? लोकांनी काय सर्च केल्यावर तुमचा विडिओ दिसला पाहिजे? विडिओ कन्टेन्ट आणि विडिओ टायटल जुळले पाहिजेत. तरच ते लोकांना आवडते.

टायटलची आयडिया येण्यासाठी गुगल आणि युट्युबवर सर्च करताना ऑटो कम्प्लिटचा फायदा करून घ्या. याने तुम्हाला लोक तुमच्या टॉपिक सोबत काय काय सर्च करतात ते समजेल.
गूगल आणि युट्युब मध्ये सर्च करताना तुम्हाला जाणवेल कि सर्च बॉक्स मध्ये तुम्ही काहीही टाईप केले कि गूगल तुम्हाला त्यासोबतचे suggestions देतो. हे suggestions म्हणजे जास्तीत जास्त सर्च झालेले keywords असतात. मग या keywords चा योग्यतो वापर करून तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी अर्थपूर्ण टायटल बनवा.

२. डिओचं डिस्क्रिप्शन (Video Description)

नेहमी तुमच्या व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शन लिहा. यातील पहिलया काही ओळी सर्च इंजिन रँकिंग साठी मत्त्वाच्या असतात. कोणी सर्च करतेवेळी वापरलेले keywords तुमच्या पहिल्या दोन ओळीत असतील तर त्याचा फायदा तुमच्या विडिओची रँकिंग वाढण्यासाठी होईल.
विडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोठे लांब keywords वापर.

३. विडिओ फाईलचे नाव

तुम्ही तुमचा विडिओ एडिट करून अपलोड करण्यासाठी तयार केला. पण विडिओचं नाव आहे movie.avi किंवा any_name.mov, तुमच्या व्हिडिओचं नाव बदलून तुमच्या विडिओ टायटलच्या keywords प्रमाणे ठेवा.
सर्च इंजिन तुमचे विडिओ उघडून बघत नाहीत. तुमच्या फाईल नेम वरूनच सर्च इंजिनला समजते कि हा विडिओ कसला आहे.
म्हणून तुमच्या व्हिडिओचे नाव हे तुमच्या keywords प्रमाणे ठेवा.

४. तुमच्या अपलोड केलेल्या विडिओचा अभ्यास करा.

YouTube Studio मध्ये जा Analytics हा ऑपशन असेल. तेथे तुमचे Top Videos असतील.
जो विडिओ तपासायचा आहे त्यावर क्लिक करा. त्या व्हिडिओचा Analytics Page उघडेल. तेथे Traffic Source मध्ये जा, तेथे तुम्हाला त्या सर्व queries (सर्च करण्यासाठी वापरलेले शब्द) दिसतील जे तुमचा विडिओ सर्च होण्यास मदत करतात. त्या queries चा उपयोग करून तुम्ही तुमच्या व्हिडिओचे टायटल, डिस्क्रिप्शन आणि टॅग्स बदलत रहा.

५. टॅग्स आणि किवर्डस सर्च

इतर सर्व गोष्टींप्रमाणे टॅग्स सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात.

व्हिडिओला टॅग्स देण्याच्या काही टिप्स.

तुमचे विशिष्ठ टॅग्स आधी द्या – तुमचे म्हत्वाचे टॅग्स आधी द्या जेणेकरून अल्गोरीदम मजबूत होते.
साधारण टॅग्स – हे टॅग्स तुमच्या किवर्डसशी निगडित असतात. जसं तुमचा मुख्य किओर्ड Techtattva असेल तर तुमचे टॅग्स असतील “Blogging” “WordPress” “YouTube Guide” etc.

तुम्ही टॅग्स शोधण्यासाठी TubeBuddy चा वापर करू शकता. TubeBuddy तुम्हाला एखाद्या keyword चा रँक सुद्धा दाखवतो. TubeBuddy हे बऱ्याच Youtubers कडून वापरले जाते.
टॅग्स मध्ये चुकीच्या स्पेलिंग्स सुद्धा असुद्या. YouTube Analytics मध्ये तुम्हाला कळेल कि लोक तुमचा विडिओ सर्च करण्यासाठी चुकीच्या स्पेलिंग्स सुद्धा लिहितात.
टॅग्स मध्ये एक वचन आणि अनेक वचन सुद्धा वापरा. जसे, जर तुमचा किवर्ड असेल Technical Blog, मग त्यासोबत “Technical Blogs” सुद्धा ऍड करा. आणि “Technical” व “Blogs” असे वेगवेगळे टॅग्स सुद्धा ऍड करा.
गरज वाटल्यास तुमचे मोठे टायटल सुद्धा टॅग्स मध्ये ऍड करा.

युट्युब व्हिडिओसाठी किवर्डस.

तुम्हाला तुमच्या व्हिडिओसाठी सर्वच योग्यते किवर्डस नाही आठवू शकत. योग्य ते सर्व किवर्डस मिळणे हे खूप महत्वाचे असते. तुमच्या व्हिडिओशी निगडित असलेले सर्व किवर्डस जाणून घेण्यासाठी Google Keyword Planner किंवा Google Display Planner वापरा.
किवर्डस सर्च करण्यासाठी तुम्ही TubeBuddy चा वापर सुद्धा करू शकता.

वरील सर्व Techniques मी स्वतः माझ्या clients साठी वापरत असतो, जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून कोणत्या Techniques माहीत असतील तर कमेंट्स मध्ये जरूर शेअर करा. आणि वरील माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असल्यास फेसबुक आणि सोशल मीडियावर तुमच्या इतर युटूबर्स मित्रांसोबत सुद्धा शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *