तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग चालू करायचा आहे? आणि ब्लॉगर म्हणून करिअर बनवायचं आहे? हो हे शक्य आहे. Techtattva च्या माध्यमातून आम्ही लोकांना ब्लॉग बनवण्यासाठी मदत करतो. ब्लॉग हा वेगवेगळ्या विषयांचा असू शकतो. त्याचे काही उदाहरण खाली आहेत.

 1. प्रवास वर्णन
 2. तुमचे विचार जगा समोर मांडणे
 3. तुमच्या अनुभवातून लोकांना शिकवणे
 4. नवीन Technology
 5. आणि बरेच काही

तुमच्या ब्लॉगचा विषय वरील पैकी एक असू शकतो किंवा नवीन काहीतरी. म्हणून वेळ न घालावाता आपण बघूया ब्लॉग कसा बनवायचा.

ब्लॉग चालू करण्याच्या स्टेप्स

 1. ब्लॉग चा विषय निवडणे
 2. ब्लॉग कशावर बनवायचा ते ठरवणे
 3. ब्लॉग साठी डोमेन आणि होस्टिंग निवडणे
 4. ब्लॉग वर WordPress install करणे
 5. ब्लॉगची design setup करणे
 6. WordPress Plugins install करणे
 7. तुमचा पहिला ब्लॉग लिहिणे

स्टेप १: ब्लॉग कशावर बनवायचा

सर्वात पहिला प्रश्न समोर असतो तो ब्लॉग कशावर म्हणजेच कोणत्या प्लॅटफॉर्म वर बनवायचा. इंटरनेट वर बरेच ब्लॉगिंग प्लॅटफॉरम्स आहेत. आणि त्यासाठी लोकांची वेगवेगळी मतं आहेत. बरेच ब्लॉगर्स आपल्या ब्लॉगची सुरुवात WordPress ने करतात. WordPress हे वापरण्यासाठी सोप्पे असल्यामुळे ब्लॉगर्सची त्याला जास्तं पसंती आहे. जगातील ३५% वेबसाइट्स या WordPress मधे बनवलेल्या आहेत.

स्टेप २: ब्लॉगचा विषय

सर्वात आधी तुम्ही तुमच्या ब्लॉग साठी विषय निवडा. कोणत्याही विषयावर ब्लॉग लिहून तुम्ही पैसे कमावू शकत नाही. तुमच्याकडे वेगवेगळे विषय असतील पण त्या सर्व विषयांवर तुम्ही एकाच वेळी ब्लॉग लिहू शकत नाही. लोकांना तोच ब्लॉग वाचायला आवडतो, जो एका विशिष्ट विषयावरच लिहिलेला असतो.
आता प्रश्न असा पडतो कि तुम्ही विषय कसा आणि कोणता निवडायचा. असा विषय निवाडा ज्याबद्दल तुम्हाला इतरांपेक्षा जास्तं माहिती असेल. असा विषय ज्याबद्दल तुम्ही खूप काही बोलू शकता. ज्याबद्दल तुम्ही जास्तं वाचता त्याबद्दल तुम्हाला जास्तं माहिती असते. असा विषय निवडा ज्यामध्ये तुम्हाला आवड आणि रुची असेल. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या परीने नवीन गोष्टी सामील करू शकता.
नवीन ब्लॉगर्ससाठी मी सुचवेन कि तुम्हाला आवडत असलेले विषय एका कागद वर लिहा. जसं Photography, Technology, Fashion, Science, Health Care, Agriculture, Food. आणि तुमच्या टॉपिक वर २-३ ब्लॉग पोस्ट लिहा. ज्या तुमच्या आवडीच्या विषयावर तुम्ही जास्तीत जास्तं मोकळेपणाने लिहू शकता तो विषय तुम्ही ब्लॉगसाठी निवडा.
याप्रकारे तुम्ही ज्या विषयात पारांगत असाल तो विषय घेऊन तुम्ही ब्लॉग लिहायला सुरुवात केली तर जेव्हा तुमचा ब्लॉग Live होईल तेव्हा काही समस्या येणार नाहीत.

स्टॅप ३: ब्लॉग साठी नाव आणि डोमेन नेम निवडणे

Domain Name
डोमेन नेम निवडताना पुढील ४ गोष्टी लक्षात ठेवायच्या.

 1. Type करण्यासाठी सोप्पं असलं पाहिजे
 2. उच्चार करण्यासाठी सोप्पं असलं पाहिजे
 3. लक्षात ठेवण्यासाठी सोप्पं असलं पाहिजे
 4. नावाचं Brand बनवता आलं पाहिजे

Domain Name म्हणजे तुमच्या ब्लॉगची URL, Visitors या डोमेन नेम ने तुमचा ब्लॉग बघतील. उदाहरणार्थ: www.techtattva.in
एका डोमेन नेम साठी ५०० ते १५०० रुपये लागतात. डोमेन नेम फ्री कसं मिळवायचं याची ट्रिक पुढे या ब्लॉग मध्ये दिलेली आहे.
तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने सुद्धा डोमेन घेऊ शकता. Personal Branding साठी हे खूप उपयोगी असते. माझा ब्लॉग पुढे इतर लोकांनी चालवावा म्हणून मी वेगळं नाव दिलं आहे.
तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी नाव निवडताना आपलं Creative Mind वापरून भन्नाट नाव शोधून काढा.
डोमेन नेम जास्तं मोठं असता कामा नये. डोमेन नेमचे extension .info .net असे न ठेवता .com .in .org असे वापरा.

स्टेप ४: ब्लॉग साठी hosting निवडणे

वेब होस्टिंग म्हणजे इंटरनेट वरील ती जागा जिथे तुमचा ब्लॉग अपलोड होईल. जिथे तुमचं WordPress install होईल. हा एक server असतो जो २४ तास चालू असतो. तिथे तुम्ही ब्लॉगमध्ये पोस्ट केलेलं सर्व images सेव्ह असतील. ज्यामुळे तुमचा ब्लॉग २४ तास लोकांसाठी चालू राहतो.
Hosting पुरवणाऱ्या बऱ्याच companies आहेत. पण मी तुम्हाला Bluehost मधून होस्टिंग घेण्याचे सुचवेन. कारण Blueost त्या सर्व गोष्टी देतो ज्या तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी गरजेच्या असतात.

 1. Free SSL
 2. Unlimited bandwidth
 3. Unlimited storage
 4. Free domain name (Saving of $12/year)
 5. Easy to use cPanel.
 6. Live chat support
 7. 30 days money back guarantee

आणि महत्वाचं म्हणजे हे स्वस्त आहे. ( ₹199.00/month* )

खालील दिलेल्या image वर क्लिक करून तुम्ही discount मिळवू शकता

.

Bluehost मधून होस्टिंग आणि डोमेन कसं विकत घ्यायचं

Get Started वर क्लिक करा

जर तुम्हाला एकच ब्लॉग बनवायचा असेल तर Basic Plan Select करा. आणि एका पेक्षा जास्त ब्लॉग्स बनवायचे असतील तर Plus Plan Select करा.

पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचा Free Domain मिळेल. जर तुमचं डोमेन नेम तुम्ही अजून ठरवलं नसेल तर I’ll create my domain later वर क्लिक करू शकता.

पुढच्या पेज वर तुम्हाला तुमची contact detail द्यायची आहे. या पेज वर तुमचा प्लान व एक्सट्रा ऑपशन्स निट बघून सिलेक्ट करा. Domain Privacy व्यतिरिक्त कोणत्याही एक्सट्रा ऑपशन ची तुम्हाला गरज नसेल. या पेज वर तुम्हाला भरघोस डिस्काउंट सुद्धा मिळेल.

पुढच्या पेज वर तुम्हाला payment चे वेगवेगळे पर्याय मिळतील.

एकदा payment झाल्यावर Bluehost सुद्धा तुमचा ब्लॉग तयार करेल. Bluehost चं inbuild function तुमचं काम सोप्प करते. ज्यांना ready made ब्लॉग पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे.

Bluehost मध्ये WordPress आधीपासूनच इन्स्टॉल असते. याचा अर्थ तुमचा ब्लॉग आता तयार झाला आहे.

स्टेप ५: ब्लॉग सेटअप करणे

Bluehost ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात ब्लॉग सेटअप Automatically होते. यात WordPress आधीपासूनच इन्स्टॉल असते. पण तरीही तुमची पहिली ब्लॉग पोस्ट लिहिण्याआधी काही बेसिक गोष्टी कराव्या लागतात.

स्टेप ६: ब्लॉगची design सेटअप करणे

ब्लॉगची design हे सर्वात मत्त्वाचं असतं. design मुळेच visitors तुमच्या ब्लॉगला पसंत करतात. design मुळे तुमचा ब्लॉग लोकांच्या लक्षात राहतो.
WordPress मध्ये WordPress Themes नावाची एक संकल्पना असते. Themes म्हणजे तुमच्या ब्लॉगसाठी Ready made design. प्रत्येक प्रकारच्या ब्लॉगसाठी यात designs असतात.
यात हजारो Free आणि Premium WordPress Themes असतात. प्रीमियम थीम मध्ये तुम्हाला थीमचे सर्व ऑपशन्स मिळतात.

स्टेप ७: WordPress Plugins

थीम इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला WordPress Plugins इन्स्टॉल करावं लागेल. Plugins म्हणजे तुमच्या थिमला सपोर्ट करणारे छोटे छोटे अँप्लिकेशन्स. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे Plugins वापरले जातात.
थीम्स सारखे Plugins सुद्धा तुम्हाला WordPress मध्ये मिळतील.

स्टेप ८: तुमचा पहिला ब्लॉग लिहिणे

इथून तुमचं महत्वाचं काम चालू होते. आता तुमचा ब्लॉग पूर्णपणे तयार झाला आहे, आणि इथून तुम्ही तुमचे ब्लॉग पोस्ट लिहू शकता.

पोस्ट लिहिताना घ्यावयाची काळजी.

 1. पोस्ट लिहिताना, तुम्ही एखाद्या व्यक्तीला समोर बसवून त्याला आपली गोष्ट समजवत आहात असं समजून पोस्ट लिहा.
 2. तुमच्या पोस्ट मध्ये तुमच्या विषयाचे सर्व पैलू दिसून आले पाहिजेत. १००० शब्दांच्या पलीकडे तुमची पोस्ट गेली तरी चालेल.
 3. तुमच्या पोस्ट साठी Google वरून images घेऊ नका. शक्यतो स्वतः काढलेले images वापरा.
 4. जर तुम्ही व्हिडिओस बनवले असतील तर ते ब्लॉग वर परस्पर नटाकता YouTube वर upload करून तुमच्या ब्लॉग मध्ये embed करा.

स्टेप ९: महत्वाचे असलेले पेज ऍड करा

 1. काही म्हत्वाचे पेज असतात जे तुमच्या ब्लॉग वर असले पाहिजे, ते सुद्धा बनवा. त्यांना तुम्ही काही वेळाने सुद्धा बनवू शकता.
 2. About Page: या पेज वर तुमची आणि तुमच्या ब्लॉगची माहिती असली पाहिजे.
 3. Contact Page: या पेज वर तुमची कॉन्टॅक्ट डिटेल असली पाहिजे.
 4. Media Kit Page: या पेजची सर्वांना गरज नसते. पण जर तुमचे काही articles news paper मध्ये आले असतील किंवा कोणत्याही electronic media मध्ये आले असतील तर त्याची माहिती, फोटोस किंवा लिंक या पेज वर देऊ शकता.
 5. या व्यतिरिक्त तुमचे अजून काही पेज असतील तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता.

अशाप्रकारे तुमचा ब्लॉग आणि तुमची पहिली पोस्ट तयार झाली आहे आणि आता तुमचा ब्लॉग लोकांसाठी ready आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *