विडिओ कन्टेन्ट हे डिजिटल मार्केटिंग साठी एक प्रभावी माध्यम आहे. सध्या युट्युब हे विडिओ ब्लॉगिंग (व्हिलॉगिंग), विडिओ शेअरिंग, विडिओ मार्केटिंग साठी वापरले जाते. युट्युब ये गुगल कडून दिलेले फ्री माध्यम आहे.
फेसबुक आणि ट्विटर सुद्धा सध्या विडिओ मार्केटिंग मध्ये पाय रोवू बघत आहेत. पण त्यांना युट्युब सारख जम बसवायला वेळ लागेल.

जर तुमचा आता एखादा युट्युब चॅनेल असेल तर तुम्ही सध्या आपल्या चॅनेलचे सबस्क्रायबर्स वाढवण्याचा प्रयत्न करत असाल. किंवा तुमचे विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असाल.

खरंच युट्युब मुळे आपण आपल्याकडे असलेली माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, ते हि काहीही खर्च न करता.

दर दिवशी करोडो लोक युट्युब वर व्हिडिओ बघत असतात. आपल्याला व्यक्त होण्यासाठी हे एक उत्तम माध्यम आहे.

ब्लॉगर्स साठी सुद्धा युट्युब हे खूप उपयोगी आहे. युट्युब मुळे ब्लॉगर आपल्या प्रेक्षकांसोबत इंटरनेट वर चांगलं व्हर्चुअल नातं बनवू शकतो.

जास्तीत जास्त युट्युब सबस्क्रायबर्स मिळवण्याचे २१ प्रभावी मार्ग

अजून एक वर्ष संपला आणि तुमचा ठरवलेला सबस्क्रायबर्स चा टार्गेट अजूनही पूर्ण झाला नाही आहे. युट्युब वर सबस्क्रायबर्स वाढवण्याचे तुमचे स्वप्न असेल तर हे २० मार्ग अवलंबून बघा.

१. तुमच्या व्हिडिओस ना वॉटरमार्क द्या

हि एक लहानशी ट्रिक आहे, युटूब तुम्हाला तुमच्या व्हिडिओस वर वॉटरमार्क लावण्याची सोया देतो. हा वॉटरमार्क तुमच्या विडिओ वर पूर्ण वेळ दिसत असतो. तुमच्या प्रेक्षकांना सबस्क्रायबर्स बनवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
तुमचा वॉटरमार्क असा दिसेल.

वॉटरमार्क ऍड करण्यासाठी तुमच्या चॅनेल मधून युट्युब ब्रॅण्डिंग पेज वर जा.

तिथे तुम्हाला वॉटरमार्क ऍड करण्याचे वेगवेगळे प्रकार दिसतील. तुम्ही कधी हि वॉटरमार्क काढून टाकू शकता किंवा बदलू शकता. वॉटरमार्क ला तुम्ही तुमचा लोगो ठेवू शकता. पण मी सुचवेन कि लोगो ऐवजी तुम्ही ” सबस्क्रायब” चा आयकॉन ऍड करा. ज्यामुळे तुम्हाला सबस्क्रायबर्स वाढवण्यास मदत होईल.

२. युट्युब अकाउंट डिफॉल्ट माहिती

हि अजून एक ट्रिक आहे ज्यामुळे आपण सर्व व्हिडिओस मध्ये प्रेक्षकांना सबस्क्रायब करण्यासाठी आठवण करून देऊ शकतो. तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये सबस्क्रायब करण्याची लिंक देऊ शकता. डिफॉल्ट टॅग्स ऍड करू शकता. यासाठी सुद्धा युट्युब ब्रॅण्डिंग पेज वर जा आणि तेथे “अपलोड डिफॉल्ट” हा पर्याय निवडा. प्रत्येक वेळी विडिओ अपलोड करताना तुम्ही हि माहिती बदलू शकता.

३. तुमच्या चॅनेल लिंक सोबत हे मॅजिक वर्ड्स जोडा

हा अजून एक प्रभावी पर्याय आहे, जेणे करून तुमच्या लिंक वर क्लिक करणारा प्रत्येक जण डायरेक्ट सबस्क्रायबर होऊ शकतो. त्यासाठी “?sub_confirmation=1” हे तुमच्या चॅनेल च्या लिंक पुढे ऍड करा आणि नवीन तयार झालेली लिंक सर्वाना पाठवा.
यामुळे काय होईल? जो कोणी या नवीन लिंक वर क्लिक करेल तो तुमच्या चॅनेल वर तर पोहोचेलच पण त्या आधी त्याला चॅनेल सबस्क्रायब करण्यासाठी एक पॉपअप येईल.

यामुळे तुमच्या प्रेक्षकांना सबस्क्रायबर्स मध्ये वाळवण्यासाठी खूप मोठी मदत होते. हि लिंक तुम्ही विडिओ डिस्क्रिपशन मध्ये सुद्धा वापरू शकता. (#२ ट्रिक)
यापुढे जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या युट्युब चॅनेल ची लिंक सोशल मीडिया, ब्लॉग किंवा कुठेही शेअर कराल तेव्हा हि नवीन लिंक शेअर करा.

४. तुमच्या व्हिडिओस साठी प्लॅन बनवा

युट्युब वर प्रभावी काम करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमचा एक प्लॅन बनवा. तुमचा चॅनेल कश्या संबंधीत असेल, तुमच्या विडिओची रूपरेषा काय असेल, ट्रेंड मध्ये चालू असलेल्या चॅनेल्स ची कॉपी करू नका. तुम्ही ज्या गोष्टीत पारांगत असाल तोच विषय निवडा.
व्हिडिओस चांगला प्रभाव पाडू शकतात जर तुम्ही आधीच सर्व तयारी केली असेल.
युट्युब व्हिडिओस बनवणे हे मूवी बनवण्यासारखेच आहे. तुमचा टॉपिक ठरवा, स्क्रिप्ट लिहा, जेणे करून तुम्ही फोकस्ड असाल कि तुम्हाला काय बनवायचे आहे. तुम्ही आऊट ऑफ ट्रॅक जाणार नाही.
स्क्रिप्टमुळे बऱ्याच गोष्टी आपण विसरत नाहीत. जसं आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे, महत्त्वाचे मुद्दे, कॉल टू ऍकशन (आमच्या चॅनेलला सबस्क्रायब करा वगैरे)
सोबत तुमच्या टार्गेट ऑडियन्स चा विचार करून त्यांना लवकर कळेल आणि ते तुमच्या व्हिडिओशी कनेक्टेड राहतील अशी स्क्रिप्ट लिहुन व्हिडिओ बनवा.

५. प्रेक्षकांना बांधून ठेवेल असे विडिओ बनवा

हे सांगण्याची गरजच नाही. पण तुमचे विडिओ हे प्रेक्षकांना बांधून ठेवणारे पाहिजेत. थोडे इन्फॉमेटिव्ह आणि मनोरंजक सुद्धा. प्रेक्षकांनी मधेच व्हिडिओ बघायचा सोडला तर त्याचा काहीच उपयोग नाही.
इन्फॉमेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओच प्रेक्षकांना जास्त आवडतात. तुम्ही जे काही कराल पण विडिओ पब्लिश करण्याआधी तुम्ही तो एकदा जरूर तपासून पहा.

६. तुमची व्हिडिओ अपलोड करण्याची गती वाढवा.

कोणी तुमच्या चॅनेल ला सबस्क्रायब करतो कारण त्यांना तुमचं काम आवडतं, म्हणून त्यांना अजून विडिओ बघायचे असतात.
सबस्क्रायबर्सना असे चॅनेल्स आवडत नसतात जे रेगुलर व्हिडिओस अपलोड करत नाहीत. चर्चेत राहण्यासाठी तुम्हाला रेगुलर बेसिस वर व्हिडिओस अपलोड करत राहावं लागेल. यामुळे तुमचे सबस्क्रायबर्स सोबत चांगले रेलशन राहतात.
कमीत कमी आठवड्यातून १ किंवा २ व्हिडिओस हे अपलोड झाले पाहिजेत. तुमचा विडिओ पब्लीश करण्याचा एक शेड्युल बनवा, आणि तसाच विडिओ पब्लिश करत राहा. हे टीव्ही सिरीयल प्रमाणे असते, ज्यात एखादा एपिसोड ठराविक वेळीच दाखवला जातो. यामुळे तुमचे सबस्क्रायबर्स तुमच्या चॅनेल सोबत कनेक्टेड राहतात, आणि त्यामुळे नवीन सबस्क्रायबर्स वाढण्यास मदत होते.

७. विडिओ टायटल

वेगळेपण हा युट्युब चा महत्वपूर्ण घटक आहे. त्यासाठी विडिओ टायटल पासून सुरुवात करा. वेगळं आणि कुतूहल निर्माण करणारं टायटल सहाजिकच प्रेक्षकांना आकर्षित करतो. पण टायटल आकर्षित असण्या सोबत तो एस ई ओ (SEO) फ्रेंडली सुद्धा असला पाहिजे.

हे काही टिप्स आहेत ज्याने तुमचे युट्युब विडिओ टायटल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल.

  • टायटल मध्ये किवर्डस (keywords) वापरा. याचा SEO वर खूप मोठा प्रभाव पडतो. गुगल सर्च इंजिन तुमचे व्हिडिओस पाहत नाहीत, म्हणून टायटल मध्ये keywords असल्याने गूगल ला कळते कि हा कसला विडिओ आहे. आणि त्याप्रमाणे सर्च करणाऱ्याला तुमचा विडिओ दाखवला जातो.
  • गुगल adwords चा वापर करून लोक सर्च करण्यासाठी कोणते keywords वापरतात ते तपासून पहा.
  • टायटल जास्त लांब बनवू नका. तुमचा परफेक्ट विडिओ टायटल हा ५० अक्षरांपेक्षा जास्त नसावा.
  • तुमचा टायटल हा वर्णनात्मक असावा. तुमच्या टायटल वरून प्रेक्षकांना कल्पना आली पाहिजे कि हा विडिओ कश्या बद्दल असेल.
  • टायटल गुंतवून ठेवणारा पाहिजे. जसं मी सांगितलं कि टायटल मध्ये जेवढ कुतूहल तेवढे त्यावर जास्त क्लिक आणि जेवढे जास्त क्लिक तेवढा विडिओचा रँक वाढेल.
  • टायटल मध्ये विडिओ हा शब्द वापरू नका. विडिओ हा शब्द उगाच जागा घेतो आणि त्याचा सर्च इंजिन साठी देखील काहीसा जास्त उपयोग होत नाही.

८. चॅनेल Personalize ठेवा

जर तुम्हाला वाटते कि प्रेक्षकांनी तुमच्या ब्रँड वर विश्वास ठेवावा तर युट्युब ने दिलेल्या सर्व सेटीन्ग्सचा वापर करून तुमचा चॅनेल personalize ठेवा.
स्वतःला प्रोफेशनल दाखवा, ज्यामुळे प्रेक्षक तुम्हाला आदर देतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवतील. जर आधीच तुमचा एखादा ब्लॉग असेल किंवा फेसबुक पेज असेल तर त्याच नावाने युट्युब चॅनेल बनवा.
युट्युब चॅनेल साठी एखादा चांगला channel art बनवा, ज्यामुळे तुमचा चॅनेल ब्रँडेड दिसेल.
युट्युब चॅनेल च्या bio मध्ये तुमचे इतर लिंक्स शेयर करा. bio जास्त लांब पण बनवू नका.

९. कस्टमायझ थंबनेल

या वर सर्व युटूबर्स सहमत असतील. तुमच्या विडिओ साठी कस्टमायझ थंबनेल बनवा. विडिओशी संबंधित असलेल्या इमेजेस वापरून बनवलेले थंबनेल जर विडिओ ला असतील तर त्यामुळे विडिओचा CTR (Click Through Rate) वाढतो. थंबनेलमुळे तुमचा विडिओ नक्की कसला आहे याची प्रेक्षकांना कल्पना येते.
युट्युब सध्या विडिओ मधून थंबनेल निवडण्यासाठी ३ पर्याय देतो. त्याव्यतिरिक्त आपण आपले कस्टमायझ थंबनेल बनवून युट्युब वर अपलोड करू शकतो.

१०. आकर्षक चॅनेल ट्रेलर बनवा.

युट्युब ने चॅनेल ट्रेलर हा एक चांगला पर्याय दिलेला आहे. ज्यामुळे एखादा विडिओ कोणी आपला चॅनेलला भेट देताच चालू होतो.
तुमचा चॅनेल ट्रेलर काळजीपूर्वक बनवा, आणि मध्ये मध्ये improve करत राहा.
ट्रेलरच्या मदतीने तुम्हाला कमीत कमी वेळेत प्रेक्षकांचे लक्ष आकर्षून घ्यायचे असते. उत्तम चॅनेल ट्रेलर हा ३० ते ६० सेकंड्स मध्ये असावा.
ट्रेलरच्या माध्यमातून तुम्हाला प्रेक्षकांना पटवून द्यायचं असते कि त्यांनी तुमच्या चॅनेल ला सबस्क्रायब का करावे. आणि या चॅनेल मध्ये त्यांना काय पाहायला मिळणार आहे.
जर तुम्ही कॅमेरा समोर comfortable असाल तर स्वतःचा personalize विडिओ ट्रेलरसाठी बनवा.

११. Call to Action चा वापर करा.

Call to Action हे विडिओ चालू असताना मधेच येणार पॉप अप असतात. जर यांचा योग्य प्रकारे वापर केला तर त्याचा जास्त सबस्क्रायबर्स मिळवण्यासाठी नक्कीच उपयोग होतो.
Call to Action मध्ये सबस्क्रायब करण्यासाठी ऍड केलेली एक साधी लिंक तुमचे सबस्क्रायबर्स वाढण्याची गती वाढवू शकतो.

१२. योग्य tools वापरा.

इंटरनेट वर युट्युब साठी बरेचसे tools आहेत. व्हिडिओस बनवण्यासाठी, व्हिडिओची जाहिरात करण्यासाठी, विडिओ SEO साठी, जर बरोबर tools वापरले तर त्याचा चांगला परिणाम तुमच्या चॅनेल वर होतो.
मी बऱ्याच वेळापासून TubeBuddy वापरत आहे. आणि कोणी खरंच युट्युब मार्केटिंग मध्ये इच्छुक असेल तर त्यांने TubeBuddy जरूर वापरावे.
TubeBuddy तुम्हाला जास्त प्रेक्षक मिळवून देण्यास, जास्त पैसे कमावण्यास आणि तुमचं युट्युब चॅनेल स्वयंचलित ठेवण्यास मदत करतो. नक्कीच try करा.

१३. लोकांसमोर visible राहा

युट्युब तुम्हाला तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग सोबत लिंक करण्याचा पर्याय देतो. आणि जर तुमची वेबसाईट किंवा ब्लॉग असेल तर याचा जरूर उपयोग करून घ्या.
यामुळे तुमच्या ब्लॉगला भेट देणारे प्रेक्षक तुमच्या युट्युब चॅनेल ला सुद्धा भेट देतात आणि त्यामुळे सबस्क्रायबर्स वाढतात. आणि वेबसाईट किंवा ब्लॉग ला युट्युब चॅनेल सोबत लिंक केल्याने तुमचा चॅनेल युट्युब कडून verify होतो authentic असल्याचे मानले जाते.
वेबसाईट किंवा ब्लॉग ऍड करण्यासाठी चॅनेल सेटिंग मध्ये पर्याय (option) आहे.
तुम्ही तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगची लिंक channel description मध्ये सुद्धा ऍड करू शकता.
तसेच तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग वर “Subscribe us” बटण ऍड करून तुमच्या वेबसाईट Viewers ना युट्युब चॅनेल कडे वळवू शकता.

१४. विडिओची वेळ लिमिट

युट्युब वर बऱ्याच प्रकारचे व्हिडिओस असतात. काही product reviews चे असतात, तर काही इन्फॉरमेशन देणार असतात. पण जे व्हिडिओस प्रेक्षकांना सबस्क्रायबर्स बनवतात ते व्हिडिओस ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेचे असतात.
एकदा का तुमचे सबस्क्रायबर्स वाढले कि तुम्ही तुमच्या विडिओची लेन्थ कमी जास्त करून प्रयोग करून बघू शकता.

१५. युट्युब Intro आणि Outro चा वापर करा

युट्युब Intro आणि Outro चा वापर फक्त ब्रॅण्डिंग साठी होत नाही तर त्याने तुमचा विडिओ तुम्ही जास्त आकर्षक सुद्धा बनवू शकता.
Intro आणि Outro ने तुमचा विडिओ प्रोफेशनल वाटतो. हे तुमच्या टीव्ही शो च्या थिम सॉंग सारखं असतं.

१६. तुम्ही तुमचे विडिओ निर्दयीपाणे कापून टाका (edit करा)

मी कुठेही एखादा चांगला फोटो अपलोड करताना त्याआधी बरेचसे फोटोस reject केलेले असतात. काहीसं तसंच विडिओ एडिटिंग बाबतीत सुद्धा असतं.
अगदी निर्दयीपणे तुम्ही तुमचे विडिओ कट करा. आणि फक्त बेस्ट व गरजेचेच क्लिप्स पब्लिश करा. जर तुम्ही कॉन्फिडन्ट नसाल तर एखाद्या गोष्टीचे मल्टिपल शॉट्स घ्या पण फक्त बेस्टच अपलोड करा.
Adobe Premier हा विडिओ एडिटिंगसाठी एक चांगला सॉफ्टवेअर आहे.

१७. विडिओ डिस्क्रिप्शन

विडिओ डिस्क्रिप्शनकडे कधीही दुर्लक्ष करू नका. डिस्क्रिप्शनमुळे विडिओ कसला आहे ते कळतेच सोबत तुमचा विडिओ सर्च इंजिन मध्ये सर्च होण्यास सुद्धा मदत होते.
टायटल प्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्ही keywords वापरले पाहिजेत.

१८. गूगल किवर्ड प्लॅनर

तुमच्या विडिओ साठी कोणते keywords योग्य आहेत ते पाहण्यासाठी गूगल किवर्ड प्लॅनरचा वापर करा. तुमच्या व्हिडिओशी निगडित असलेले सर्व keywords / tags तुमच्या विडिओ मध्ये ऍड करा. जेणेकरून तुमचा विडिओ गूगल आणि युट्युब दोघामध्ये सर्च होईल.
तुमच्या विडिओला कमी views असणे याचे कारण keywords आणि tags चा कमी वापर सुद्धा असू शकतो.
तुम्ही तुमच्या चॅनेल सारखे असलेले व्हिडिओ पाहून त्यांनी वापरलेले keywords आणि tags बघू शकता. पण ते तसेच्या तसे कॉपी करू नका.

१९. एका चांगल्या मॅसेजने तुमचा विडिओ संपवा

तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना तुमच्या चॅनेलला सबस्क्रायब करायला सांगू शकता. त्यांना तुमचा विडिओ like आणि share करायला सांगा. तुमची वेबसाईट / ब्लॉग चेक करायला सांगा. त्यांना काय बघायला आवडेल ते कमेंट मध्ये लिहायला सांगा.
जर तुम्ही तुमच्या सबस्क्रायबर्सना काही विचारलंच नाही तर तुम्हाला त्यांना काय पाहिजे ते कळणारच नाही.
शेवटी तुमच्या viewers ना धन्यवाद करायला विसरू नका.
विडिओच्या शेवटी “Subscribe” चा call to action ऍड करा.

२०. दुसऱ्या युटूबर्स सोबत collaboration (सहयोग) करा.

याचा सर्वानाच फायदा होतो. ये तुमच्या प्रेक्षकांसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा चांगला आहे.
तुमच्या विषयाशी निगडित असलेल्या दुसऱ्या युटूबर्सना भेटा, त्यांच्याशी एकत्र काम करा. यामुळे तुम्हाला त्यांच्या प्रेक्षकवर्गाशी संवाद साधता येतो. त्यामुळे नवीन सबस्क्रायबर्स मिळण्यास मदत होते.

२१. तुमच्या प्रामाणिक सबस्क्रायबर्स सोबत संवाद साधा.

सोशल मीडियाचा जन्म यासाठीच झाला आहे. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून तुम्ही तुमच्या फॅन्स सोबत संवाद साधत राहा, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत राहा. त्यांना देखील प्रश्न विचारत राहा, कि त्यांना काय बघायला आवडेल.
कधी कधी निगेटिव्ह प्रतिक्रिया देखील येऊ शकतात, त्यांना समंजसपणे हाताळा. विडिओ वर आलेल्या सर्व कमेंट्सला उत्तरं दया. त्यामुळे तुमच्या सबस्क्रायबर्सचा तुमच्यावर विश्वास बसतो.

२२. सबस्क्रायबर्सना challenges आणि giveaway द्या.

Giveaway म्हणजे बक्षिसं. आणि हे कोणाला आवडत नाही?
तुम्ही तुमच्या सबस्क्रायबर्सना return gift म्हणून giveaway देऊ शकता.
Giveaway मध्ये बक्षीस जर खरंच चांगलं असेल, तर तुमचे followers त्या बद्दल त्यांच्या मित्र मैत्रिणींना पण सांगतील. आणि तुमचा विडिओ share पण करतील. हि फ्री ची पब्लिसिटी आहे. आणि वायरल पब्लिसिटी सुद्धा.
Giveaway मध्ये तुम्ही प्रेक्षकांना तुमचे सर्व सोशल चॅनेल follow करायला सांगू शकता. तुमच्या युट्युब चॅनेलला सबस्क्रायब करायला सांगू शकता.
शक्यतो तुमचं giveaway हे तुमच्या चॅनेलच्या टॉपिकशी निगडित असावे.

२३. क्रॉस प्लॅटफॉर्म प्रोमोशन गरजेचे आहे.

या सोशल मीडियाच्या जगात डिजिटली जिवंत राहण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सोशाल मीडिया प्लॅटफॉर्म वर active राहावं लागेल.
जर तुम्हाला ब्रँड बनवायचा असेल तर तुम्हाला सतत लोकांसमोर राहावं लागेल.
फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, पिंटरेस्ट या सर्व sites वर तुमची प्रोफाइल असणे गरजेचं आहे. जर तुम्हाला एवढ्या सर्व सोशल मीडिया साईट्स manage करणे अवघड वाटत असेल तर तुम्ही Buffer सारखे Auto – Scheduling app वापरू शकता. असे apps तुम्हाला वेळच्या वेळी ऑटो पोस्ट करायला मदत करतात.
पुढे जाऊन तुम्ही प्रोमोशन साठी फेसबुक आणि गूगल adds चा पर्याय सुद्धा निवडू शकता.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या चॅनेल चा ब्रँड बनवू शकता. इंटरनेट वर जास्तीत जास्त active रहा.

खास टीप : पहिल्या १००० सबस्क्रायबर्स साठी खूप मेहनत घ्या.

तुम्ही तुमचे पहिले १००० सबस्क्रायबर्स मिळवण्यासाठी सर्व possible strategies वापरा. तुमचा युट्युब चॅनेल जास्तीत जास्त प्रोमोट करा. जर तुमच्या चॅनेलचे सबस्क्रायबर्स लवकर वाढत असतील तर तुम्हाला अजून काम करायला उत्साह सुद्धा येईल.
ज्याने इतरांना फायदा होत असेल त्याने तुम्हाला देखील फायदा होईलच असं नाही. म्हणून प्रयोग करत रहा.
कॅमेरा अँगल, बॅकग्राऊंड. विडिओ थंबनेल आणि वर दिलेले सर्व टेक्निक्स यासोबत सुद्धा प्रयोग करत राहा. आणि तुमच्या सबस्क्रायबर्सच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवा.
युट्युब वर आपलं ब्रँड बनवायला थोडा वेळ लागतो. त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो, पण संयम ठेवून सर्व केला कि त्याचा नंतर फायदाच होतो.

जर तुमच्या काही टेक्निक्स असतील तर त्या माझ्या सोबत कमेंट मध्ये जरूर share करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *